राहुल गांधींनी पुन्हा 'SIR'वर हल्ला चढवला.
गुजरातबाबतचे कागदपत्र केले शेअर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता गुजरातमधील मतदारयादी विशेष गहन पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गुजरातमध्ये मतदारयादी पडताळणीच्या नावाखाली पद्धतशीर आणि संघटित मतचोरीचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांनी गुजरात काँग्रेस पक्षाच्या पत्रासह मतदारयादी शेअर करताना निवडणूक आयोगावर केंद्र सरकारसोबत कट रचल्याचा आरोपही केला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी एसआयआरसंबंधी पुन्हा एकदा परखड मतप्रदर्शन केले. गुजरातमध्ये ‘एसआयआर’च्या नावाखाली सुरू असलेली प्रक्रिया पद्धतशीर, संघटित आणि धोरणात्मक मतचोरीचा प्रकार आहे. येथे विशिष्ट समुदायांची आणि काँग्रेस समर्थक बूथमधील मते निवडकपणे नाकारण्यात येत आहेत. ज्याठिकाणी भाजपला पराभव दिसतो तिथे मतदारांना वगळून टाकले जाते, असा आरोपही त्यांनी केला.
Comments are closed.