राहुल गांधी, खरगे यांनी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात इतर नेत्यांसोबत बैठक घेतली. पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची रणनीती आणि इतर राजकीय मुद्यांवर चर्चा झाली. सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनातील मुद्द्यांसंबंधीही या बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेचा तपशील कोणत्याही नेत्यांकडून सविस्तरपणे उघड करण्यात आला नसला तरी येत्या महिन्यात विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचाराची रणनीती सदर बैठकीत आखण्यात आल्याचे समजते.

Comments are closed.