डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोननंतर फक्त 5 तासातच नरेंद्र मोदींनी युद्ध थांबवलं, राहुल गांधींचा आरोप
राहुल गांधी चालू पंतप्रधान नरेंद्र मोदी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान विरोधात सुरु असलेली दहशतवादी छावण्यांवरील भारताची कारवाई तात्काळ थांबवली होती. त्यांनी हे सर्व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरुन केल्याचे राहुल गांधी म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 तासात पाकिस्तानविरोधात सुरु असलेली कारवाई थांबवण्याचे सांगितले होते, मात्र, नरेंद्र मोदींनी 24 तासांत नाही तर 5 तासांत सर्व काही थांबवल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
बुधवारी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे ‘मतदार हक्क यात्रा’ रॅलीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, मोदींनी पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवरील भारताची कारवाई तात्काळ थांबवली होती आणि हे सर्व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरून घडले होते.
ट्रम्पच्या दाव्यांवर राहुल गांधी काय म्हणाले?
जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होते, तेव्हा ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना फोन केला होता. त्यांना जे काही सुरु आहे ते 24 तासात थांबवा. यानंतर नरेंद्र मोदींनी 24 तासांत नाहीतर फक्त 5 तासातच सर्व काही थांबवल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्धबंदी आणल्याचा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच पुन्हा सांगितले की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान हस्तक्षेप केला होता. त्यांनी युद्ध रोखण्यात भूमिका बजावली होती. त्यांनी व्यापार आणि शुल्काची धमकी देऊन मोदींना युद्धबंदी करण्यास भाग पाडले. त्यांनी व्हाईट हाऊसमधील बैठकीत दावा केला की, ‘मी मोदी आणि पाकिस्तानशी बोललो आणि सांगितले की जर तुम्ही युद्ध थांबवले नाही तर आम्ही कोणताही व्यापार करार करणार नाही आणि उच्च शुल्क लादू. त्यानंतर मोदींनी फक्त पाच तासातच सर्व काही थांबवले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, मी पाकिस्तानला सांगितले होते की आम्ही कोणताही व्यापार करार करणार नाही, आम्ही तुमच्यावर इतके उच्च शुल्क लादू की तुम्हाला समजूही शकणार नाही. तुम्ही अणुयुद्धाकडे जात आहात आणि हे होणे शक्य नाही. त्यानंतर पाच तासात युद्ध थांबवल्याचे राहुल गांधी म्हणाले.
भारताने ट्रम्प यांचे दावे फेटाळले
भारताने ट्रम्प यांचे हे दावे सातत्याने फेटाळले आहेत. भारताचे म्हणणे आहे की पाकिस्तानसोबत गोळीबार आणि युद्धबंदीचा करार दोन्ही देशांच्या सैन्याच्या महासंचालकांच्या (डीजीएसएमओ) पातळीवर थेट चर्चेनंतर झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच संसदेत स्पष्ट केले आहे की कोणत्याही देशाचा नेता भारताला त्यांची लष्करी कारवाई कधी थांबवायची हे सांगू शकत नाही. ते म्हणाले की ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्याचा निर्णय भारताने स्वतःहून घेतला होता आणि कोणत्याही बाह्य दबावाखाली नाही.
महत्वाच्या बातम्या :
Donald Trump : भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं, सहा युद्धांमध्ये मध्यस्ती, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल द्या; व्हाईट हाऊसची मागणी
आणखी वाचा
Comments are closed.