राहुल गांधींनी नितीशकुमारांवर निशाणा साधला
बिहारमधील जातीय जनगणना बनावट असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ पाटणा
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी बिहारची राजधानी पाटणा येथील आपल्या एक दिवसीय दौऱ्यादरम्यान ‘संविधान संरक्षण’ विषयावर आयोजित परिषदेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संविधान सुरक्षा परिषदेला संबोधित करताना बिहारमध्ये झालेली जातीय जनगणना बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला देशात योग्य पद्धतीने जातीय जनगणना करायची आहे. जातीय जनगणनेशिवाय देशातील प्रत्येकाचा विकास होऊ शकत नाही, असा दावाही त्यांनी केला. ‘देशातील जातींची खरी स्थिती शोधणे महत्त्वाचे आहे. जातीय जनगणना ही देशासाठी एक्स-रे आणि एमआरआयसारखी आहे. सदर माहितीतून कोणत्या क्षेत्रात कोणत्या वर्गातील किती लोक आहेत हे कळेल’, असे ते म्हणाले.
Comments are closed.