सभागृहात गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाईचा अहवाल सादर करा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कामकाज सुरू असताना प्रशासकीय अधिकाऱयांच्या अनुपस्थितीवरून आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनाला फैलावर घेतले. ‘‘सभागृहाचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही,’’ अशी तंबी देत संबंधित अधिकाऱयांवर काय कारवाई केली याचा कृती अहवाल येत्या सोमवारी सकाळी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आज सभागृहात अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारीच लॉबीमध्ये उपस्थित नव्हते. यावरून आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहातील गोंधळ आणि सदस्यांच्या भावना लक्षात घेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप केला.

राहुल नार्वेकर म्हणाले की, लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रशासनाने गांभीर्य राखणे बंधनकारक आहे. संबंधित अधिकाऱयांविरुद्ध आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याचा सविस्तर अहवाल सोमवारी 16 मार्चपर्यंत कार्यालयीन कामकाज सुरू होताच दालनात सादर करावा, असे आदेश नार्वेकर यांनी सरकारला दिले.

Comments are closed.