23 दूध डेअऱ्यांवर छापे, पुणे ग्रामीण पोलिसांसह एफडीएची कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रसायन, शॅम्पू आणि पावडरची भेसळ असलेल्या केमिकलयुक्त दुधाच्या निर्मितीचा पुणे ग्रामीण पोलिसांसह अन्न व औषध विभागाने पर्दाफाश केला आहे. भेसळयुक्त दूध मोठमोठय़ा डेअरींना विक्री करून लाखो रुपये कमवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, सिल्लोडसह राज्यातील तब्बल 23 ठिकाणांवरील दूध डेअऱ्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. त्याद्वारे अडीच कोटींहून अधिक रकमेचा ऐवज जप्त केला. अन्न औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

दूध डेअरीद्वारे संकलन करताना छोटय़ा संकलनांकडून मोठय़ा प्रमाणात दुधात भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी एफडीएकडे आल्या होत्या. त्याआधारे 36 तास ऑपरेशन राबवून भेसळखोरांना दणका देण्यात आला. दूध भेसळखोरांविरुद्ध कारवाई केल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त  केले.

अशी केली जात होती भेसळ

केमिकल, शॉम्पू, दुधाची पावडर एकत्रित करून भेसळयुक्त दुधाची निर्मिती केली जात होती. गावोगावी छोटय़ा संकलकांकडून दूध गोळा केल्यानंतर एकत्रित केलेल्या दुधात भेसळयुक्त दूध मिसळले जात होते. भेसळयुक्त दूध आणि शेतकऱ्यांनी घातलेला रतीब एकत्रित झाल्यानंतर दूध टँकरद्वारे मोठमोठय़ा डेअरीला विक्रीसाठी रवाना केले जात होते.

Comments are closed.