एकच शेठ भरतशेठ! रायगडचा पालकमंत्री मीच होणार, गोगावलेंना विश्वास, अंतिम निर्णयाची तारीख किती?

Bharat Gogawale : रायगड (Raigad) जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा (Raigad Guardian Minister) तिढा नेमका कधी सुटणार? असा सवाल केला जात आहे. मात्र, याबाबत मंत्री भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एक तिढा सुटला आता दुसरा तिढा सुधा सुटेल, असे म्हणत भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदाबाबत योग्य सूतोवाच दिले आहेत. येत्या 2 मार्चपर्यंत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल. मुख्यमंत्री 2 मार्चला महाडमध्ये आल्यावर चर्चा होईल असे गोगावले म्हणाले. पण रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय माझ्याच बाजूने लागणार असल्याचे गोगावले म्हणाले.

निर्णय माझ्याच बाजूने लागणार

रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय माझ्याच बाजूने लागणार असल्याचं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे. एकच शेठ भरत शेठ म्हणत गोगावले यांनी पुन्हा रायगड पालकमंत्रीपदाचे संकेत दिले आहेत.

नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेचं राहणार?

विधानसभेचा निकाल लागून, नव्या मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन 3 महिने उलटले तरी राज्यातील नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षात पालकमंत्रीपदावरुन धूसफूस सुरु असल्याच्यी चर्चा सुरु आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांत पालकमंत्रीपदावरून धूसफूस सुरू होती. मात्र आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटल्याचे दिसत आहे. नाशिक जिल्ह्याच पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाकडेच राहणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री होणार अशी सूत्रांची माहिती आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे भाजप हे नाशिकचे पालकमंत्रीपद स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला दिली होती स्थगिती

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद सरू होता, महायुतीच्या नेत्यांमदध्ये धूसफूसही सुरू होती. त्यामुळे जानेवारी महिन्यात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून ( शिंदे गट) विरोध झाला. तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. नाशिकमध्ये पालकमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. दादा भुसे यांना डावलून गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिल्याने कार्यकर्ते नाराज होते. मात्र भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा कायम ठेवला होता. आता अखेर भाजपाकडेच नाशिकचं पालकमंत्री पद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2 वर्षानंतर सिंहस्थ कुंभमेला होणार असून, त्याअनुषंगाने सर्व तयारीसाठी भाजप हा पालकमंत्री पद स्वत:कडेच ठेवणार असल्याचं समजतं. गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी: नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली, रायगडचा पेच कायम

अधिक पाहा..

Comments are closed.