पंजाबमध्ये 'रेल रोको' आंदोलन; 6 जिल्ह्यांतील रेल्वे सेवा प्रभावित.

मोगामध्ये पोलिसांसोबत धक्काबुक्की

चंदीगड : पंजाबच्या मोगामध्ये स्वत:च्या मागण्यांवरून शेतकरी संघटनांनी रेल्वेमार्गावर आंदोलन करत पंजाब सरकारच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. तर शेतकऱ्यांना रेल्वेमार्गापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकऱ्यांना बॅरिकेडिंग ओलांडून रेल्वेमार्गापर्यंत जाण्यास यश मिळविले आणि तेथे आंदोलन सुरू पेले. आंदोलनादरम्यान रेल्वेस्थानकाच्या बाहेर शेतकरी आणि पोलिसांदरम्यान धक्काबुक्की देखील झाली. शेतकऱ्यांनी स्वत:च्या मागण्यांवरून पंजाब सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी स्वत:च्या मागण्यांवरून जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंजाबच्या मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करत असताना सरकार जागे झाले नव्हते. याचमुळे आम्हाला नाईलाजास्तव रेल्वेवाहतूक रोखावी लागली, असा दावा शेतकरी नेते बलदेव सिंह जीरा यांनी केला. अमृतसर, गुरदासपूर, फिरोजपूर, मोगा, संगरूर आणि सुनाम समवेत 6 ठिकाणी रेल्वेवाहतूक रोखण्यात आली आहे.

Comments are closed.