रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे वडील निधन झाले
वृत्तसंस्था/ जोधपूर
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वडील दौलाल वैष्णव यांचे मंगळवारी जोधपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) निधन झाले. 81 वर्षीय दौलाल वैष्णव गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकालीन आजारांशी झुंज देत होते. सकाळी 11:52 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनसमयी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आपल्या वडिलांसमवेत होते. ते सोमवारी रात्रीच दिल्लीहून जोधपूरला पोहोचले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर राजकीय आणि सामाजिक जगात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Comments are closed.