मुंबई, ठाण्यासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात पुढील काही तासात वीजांच्या कडकडाटासह पाऊस

गेल्या काही दिवसांपासून ब्रेक घेतलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा एकदा काही शहरांमध्ये हजेरी लावली. शुक्रवार सकाळपासून ही अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढील काही तासात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर या शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Comments are closed.