मुंबईत या आठवड्यातही पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पुणे आणि रायगडसह महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी हा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्याच्या शेवटपर्यंत पावसाची रिमझिम सुरू राहिल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील आठवड्यात मुंबईतील तापमान स्थिर राहील, कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सियस तर किमान 25अंश सेल्सियस ते 26 अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार आकाश अंशतः ढगाळ राहील आणि जवळजवळ दररोज एक-दोन वेळा पावसाच्या किंवा मेघगर्जनासह सरींची शक्यता आहे. 21 सप्टेंबर रोजी शहरातील काही भागांत पाऊस अपेक्षित आहे, तर 22 ते 24 सप्टेंबरदरम्यान अधूनमधून होणारा पाऊस आर्द्रतेतून दिलासा देऊ शकतो. 25 आणि 26 सप्टेंबरलाही हेच वातावरम कायम राहील, ठिकठिकाणी मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे.

Comments are closed.