IND vs AUS: होबार्टमध्ये पावसाच्या अडथळ्याने टीम इंडियाचा खेळ बिघडणार का? जाणून घ्या सविस्तर

ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियामधील (IND vs AUS) टी-20 मालिका सध्या रंगात आली आहे. या मालिकेतील तिसरा सामना 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:45 वाजता होबार्ट येथे खेळला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागल्याने आता मालिका अधिकच रोमांचक झाली आहे. सध्या यजमान ऑस्ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात जबरदस्त पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण प्रश्न असा आहे की, होबार्टमध्ये पाऊस भारताच्या खेळात अडथळा आणणार का? हा विचार सध्या सर्व चाहत्यांच्या मनात आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा टी-20 सामना बेलेरीव ओव्हल, होबार्ट येथे होणार आहे. 2 नोव्हेंबर रोजी येथील हवामान अगदी नीट राहणार आहे. पावसाची शक्यता फक्त 10 टक्के इतकीच आहे. वाऱ्याचा वेग सुमारे 19 किमी प्रति तास राहील. हवेतील आर्द्रता (ह्यूमिडिटी) 45 टक्के, तर तापमान सुमारे 26 डिग्री सेल्सियस असेल.

म्हणजेच सामना खेळताना हवामान थंड नसणार. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना थोडीफार मदत मिळू शकते. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे या मैदानावर दमदार पुनरागमनाची संधी आहे. आकाश स्वच्छ असल्याने स्विंग गोलंदाजांना फारशी मदत मिळणार नाही, त्यामुळे भारतीय फलंदाजांसाठी धावा करणे सोपे ठरेल. या विकेटवर धावांची आतषबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Comments are closed.