उत्तर राज्यांमध्ये पाऊस पडत आहे
छत्तीसगडमध्ये ट्रॅक्टरसह वाहून गेलेले 7 जण बचावले
वृत्तसंस्था / देहराडून
छत्तीसगडमधील नऊ जिह्यांमध्ये मध्यम पाऊस आणि वीज पडण्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कवर्धा येथील घुमाचापर गावाजवळील तामरू नाल्यात वाळूने भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे सात कामगार वाहून गेले. तथापि, सर्व कामगार पोहून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याने बचावले. धमतरी जिह्यातील नागरी ब्लॉकमधील सिंगपूर पठार जवळील एक कड अचानक पाण्याखाली आल्यामुळे एक तरुण दुचाकीसह कड्यावरून वाहून गेला.
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये मान्सून अजूनही सक्रिय आहे. हवामान खात्याने बुधवारी या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तथापि, राजस्थान, गुजरात आणि पंजाबमधून मान्सून मागे हटण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी देहराडून आणि उत्तराखंडच्या इतर भागात ढगफुटीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. पावसामुळे आणि आपत्तीमुळे 15 जणांचा मृत्यू झाला आणि 16 जण अजूनही बेपत्ता आहेत.
Comments are closed.