मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले आहेत – संजय राऊत

महाराष्ट्र आणि मराठी माणूस वाट पाहात असलेला क्षण अखेर समोर आला. मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दोन्ही एकत्रितपणे लढवणार असल्याची घोषणा झाली. या ऐतिहासिक क्षणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता. आज हाच मराठी ऐक्याचा मंगल कलश एकत्र घेऊन राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आल आहेत.

पुढे बोलताना ‘महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण’ असल्याचे संजय राऊत म्हणाले. ‘आज महाराष्ट्रात आनंदाचा क्षण आलेला आहे. मराठीच्या ऐक्यासाठी हाच मंगल कलश मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये भगवा ध्वज फडकवणार. या महाराष्ट्राला केवळ ठाकरे नेतृत्व देऊ शकतात. महाराष्ट्रातील जनता ठाकरेंच्याच मागे ठामपणे उभे राहिल, हे ठामपणे सांगतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments are closed.