नव्या मशीनमुळे मतदानात गडबड होणार नाही याची खात्री कोण देणार? राज ठाकरे यांचा सवाल

पाच वाजल्यानंतरही मतदारांना भेटण्याची मुभा यावेळीच का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला. तसेच नव्या मशीनमुळे मतदानात गडबड होणार नाही याची खात्री कोण देणार? असेही राज ठाकरे म्हणाले.

आज दादरच्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शीवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, काल पाच वाजता प्रचार थांबला. आजपर्यंत ज्या निवडणुका आम्ही पाहतोय, त्यात निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मतदान. हे आतापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा आजवर होती. या सरकारला काय हवंय यासाठी निवडणूक आयोग जे करतंय. निवडणूक आयोगाने काल पत्रक जारी केलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा कुठून आली याबाबत कल्पना नाही. ही प्रथा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला का नव्हती? पत्रकात म्हटलंय की उमेदवार मतदारांना भेटू शकतात पण पत्रकं वाटू नाही शकत. पैसे वाटण्यासाठी ही वेळ दिली आहे का? ही मुभा का दिली आणि हा कायदा का बदलला? असे राज ठाकरे म्हणाले.

तसेच दुसरी गोष्ट अशी की निवडणूक आयोगाने पाडू नावाची नवीन मशीन आणली आहे पाडू.  Printing Auxiliary Display Unit. या बाबत कुठल्याही पक्षाला कल्पना दिलेली नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून मनमानी कारभार सुरू आहे. वाघमारे याबाबत उत्तर द्यायला तयार नाहीत. आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकला आहे म्हणून त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. या कोणत्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू आहेत? निवडणुकीच्या तोंडावर रोजच्या रोज हे कायदे बदलत आहेत. पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा याबाबत त्यांना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. जनेतेनेही याबाबत प्रश्न विचारले पाहिजेत. सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी निवडणूक आयोग आहे का? सरकारल्या ज्या सुविधा हव्या आहेत त्यासाठी निवडणूक आयोग कार्यरत आहे का? हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, सतर्क राहा, आपल्या विभागात आणि बुथवर काय सुरू आहे यावर लक्ष ठेवून रहा. सत्ताधाऱ्यांच्या उमेदवारां लक्ष ठेवा की ते कुठे पैसे वाटत आहेत? शिंदेंच्या लोकांनी पैसे वाटल्याचे दिसत आहे, आनंदाची बाब म्हणजे लोकांनी ते नाकारलेलं दिसतंय. हरलेली गोष्ट जिंकण्यासाठी निवडणूक आयोग मदत करतंय का? हा निवडणूक आयोगावर आमचा आरोप आहे. जनेतेने आणि दोन्ही पक्षांच्या सहकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नवीन मशीन आलेलं हे आधी का दाखवण्यात आलं नाही? या मशीनमधून मतदानाची गडबड होणार नाही याची खात्री कोण देणार? इतकी बेबंदशाही सुरू आहे अशी टीकाही राज ठाकरे यांनी यावेळी केली.

Comments are closed.