दुबेंना हिसका दाखवणाऱ्या काँग्रेस खासदारांचे राज ठाकरेंनी केले अभिनंदन

मराठी माणसांना आपटून आपटून मारू, अशी दर्पोक्ती करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना संसद भवनात घेराव घालून हिसका दाखवणाऱ्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून अभिनंदन केले.
महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस या समोर कोणतेही वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत, असे राज यांनी या पत्रात नमूद केले आहे. सव्वाशे वर्षे हिंद प्रांतावर राज्य करणारे आणि 1857चा उठाव असू दे, की पुढच्या स्वातंत्र्यलढ्याला आकार देणारे मरहट्टे होते याचा आपल्याला विसर पडतो. म्हणूनच या उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे आणि तुम्ही ती दाखवलीत याबद्दल मनापासून आभार, असे राज यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे. तुमची हिंमत कौतुकास्पद आहे, असे सांगतानाच महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील, असा विश्वासही राज ठाकरे व्यक्त केला.
Comments are closed.