महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते? -राज ठाकरे
महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते? असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषेचा कडवटपणा काय असतो हे जरा इतर राज्यांमध्ये जाऊन बघा, प्रत्येकाने मराठीतच बोला, समोरचा हिंदीत बोलायला लागला तरी तुम्ही मराठीतच उत्तर द्या, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
वसंत व्याख्यानमालेत ‘माझ्या मनातला महाराष्ट्र मराठी अस्मिता’ या विषयावर राज ठाकरे यांचे व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे महत्त्व आणि व्याप्ती सांगतानाच त्यांनी राज्यातील भयानक वास्तव उपस्थितांसमोर मांडले.
Comments are closed.