हिंदी लादणाऱ्यांचे कान ओढा! राज ठाकरे यांचा संताप
‘भाषावाद’ हा ‘स्थानिक आजार’ असल्याचे वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘मोहन भागवत यांनी आधी देशभरात हिंदी लादणाऱ्यांचे कान ओढून दाखवावेत आणि त्यानंतरच आम्हाला शिकवावे’ असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुंबईत आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेत मोहन भागवत यांनी भाषावादावर आपले मत मांडले. कोणत्याही भाषेबाबत अतिआग्रही राहणे आणि त्यावरून वाद करणे अयोग्य आहे. भाषेच्या मुद्दय़ावर होणारे आंदोलन किंवा संघर्ष हा एखाद्या ‘स्थानिक आजारा’सारखा असल्याचे भागवत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर मराठी अस्मितेबाबत अनेकांनी परखड मत मांडून जोरदार टीका केली आहे.
Comments are closed.