बोधनकरांपासून सुरू झालेला प्रवास बोध कीर्तनापर्यंत आला – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुस्तकातील आशय, संजय राऊत यांची लेखनशैली यांचे कौतुक करतानाच राऊत यांच्या पत्रकारिता कारकीर्दीतील जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. पूर्वी अंडरवर्ल्डवर प्रभावी लिखाण करणारे संजय राऊत यांचा प्रवास पोलीस अधिकारी जयप्रकाश बोधनकरांपासून आज बोध कीर्तनापर्यंत झाला, असे राज ठाकरे म्हणाले. भाषा कशी सोपी आणि प्रभावी असावी हे संजय राऊत यांच्या पुस्तकातून दिसून येते. नाहीतर मला आलेल्या न्यायालयाच्या नोटिसा पाहिल्या तर धरलेय की सोडलेय हेच कळत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. संजय राऊत यांच्यासोबत आपली मैत्री जुनी असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी ‘सामना’च्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. ‘बोध कीर्तन’ पुस्तक उत्तम झाले आहे. त्यात बोध देणाऱया अनेक गोष्टी आहेत. अशी पुस्तके तुरुंगात राहूनच निर्माण होतात, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्यांच्याकडून अशी अनेक पुस्तके निर्माण व्हावीत, मात्र ती तुरुंगाबाहेर राहून, असे राज ठाकरे म्हणाले.
भाषा कशी सोपी, समजेल अशी, पण प्रभावी असावी हे संजय राऊत यांच्या पुस्तकातून दिसून येते.
Comments are closed.