मोठी बातमी: मुंबई मनपासाठी राज ठाकरेंचा पहिला मोहरा ठरला, पहिली उमेदवारी कुणाला?
राज ठाकरे उद्धव ठाकरे बीएमसी निवडणूक 2026: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि शिवसेना-भाजपच्या महायुतीपैकी कोणाची सरशी होणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतीच शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा जागावाटपही झाले आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
दादरमधील मुंबई महापालिकेतील वार्ड क्रमांक 192 हा युतीच्या अंतिम चर्चेमध्ये मनसेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर 192 वॉर्डमधून राज ठाकरेंच्या मनसेकडून मनसे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) निवडणूक लढवणार सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंकडून पहिला उमेदवार (Shivsena UBT-MNS Yuti) ठरल्याची चर्चा आहे. 2017 च्या निवडणुकीत 192 या वॉर्डमधून ठाकरे गटाच्या प्रिती पाटणकर विजयी झाल्या होत्या. (MNS Candidate List BMC 2026)
वॉर्ड192 वरुन ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी- (Raj Thackeray Uddhav And Thackeray Alliance)
वॉर्ड 192 साठी ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून नाराजीनाट्य सुरु झालं आहे. मुंबई महापालिका वॉर्ड क्रमांक 192 आणि 194 तिढा सोडवितांना वार्ड क्रमांक 192 हा मनसे पक्षाकडे आणि 194 वॉर्ड हा ठाकरेंच्या शिवसेनेला युतीमध्ये सोडण्यात आल्याची माहिती आहे. मात्र वॉर्ड क्रमांक 192 आपल्याला मिळावा यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना दुपारी चार वाजता भेटणार आहेत. माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हे शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला येणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान-
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर (BMC Election Date 2026) झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या.
मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)
- नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
- उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
- अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
- मतदान- 15 जानेवारी 2026
- मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026
2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक (Party Wise Corporator BMC 2017)
शिवसेना- 84
भाजप- 82
काँग्रेस- 31
राष्ट्रवादी काँग्रेस- 9
मनसे- 7
समाजवादी पक्ष- 6
एमआयएम- 2
अपक्ष- 5
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.