मनसे पदाधिकाऱ्यांचा आज रंगशारदात मेळावा, राज ठाकरे करणार मार्गदर्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
मनसेचे मुंबईतील सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, महिला व पुरुष विभाग अध्यक्ष, विभाग सचिव, उपविभाग अध्यक्ष, उपविभाग सचिव, शाखा अध्यक्ष, शाखा सचिव व उपशाखा अध्यक्ष तसेच मुंबईतील सर्व विद्यार्थी सेना राज्य कार्यकारिणी व विभाग अध्यक्ष, अंगीपृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आदींना या मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली आहे.

Comments are closed.