शिवसेना आजही तेवढय़ाच ताकदीने उभी आहे!

राजन धुरी यांच्यासह पालघर जिह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले व त्यांना मार्गदर्शन केले. ‘शिवसेना संपली असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण शिवसेना कधीच संपू शकत नाही. शिवसेना आजही तेवढयाच ताकदीने उभी आहे. आठवडय़ातून दोन-चार वेळा शिवसेनेत प्रवेश होत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘अमित शहा आणि कंपनीला वाटले होते की शिवसेना संपली. पण परिस्थिती अशी आहे की आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय त्यांच्या गळ्याखाली घास उतरत नाही. आपली ताकद त्यांना त्रासदायक ठरते आहे. महाराष्ट्र गिळण्यासाठी त्यांना शिवसेना संपवायची आहे. तो गिळू न देणारी शिवसेना त्यांना नको आहे. विधानसभेत अनपेक्षित निकाल लागला, पण आता त्यांचे मतचोरीचे बिंग फुटले आहे. त्यामुळे आता मतदार यादीवर काम करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
राजन धुरी यांच्यासह पालघर जिह्यातील वाडा तालुका व भिवंडी ग्रामीण विधानसभेतील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ’मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, ऍड. अनिल परब, उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे, विश्वास थळे, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील आदी उपस्थित होते.

Comments are closed.