रत्नागिरी नगर परिषद निवडणूक – शिंदे गटाचे माजी आमदार राजन साळवींना धक्का, मुलगा अथर्वचा पत्ता कट

शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या माजी आमदार राजन साळवी यांना रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. माजी आमदार राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी हा रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र.१५ मधून इच्छुक होता. सोमवारी अथर्व साळवी उमेदवारी अर्ज भरणार अशी चर्चा असताना डाव पलटला. भाजपच्या माजी नगरसेवकाला शिंदे गटात घेऊन उमेदवारी देण्यात आल्याने माजी आमदार राजन साळवी यांच्या मुलाचा पत्ता कट झाला आहे.

प्रभाग क्र.१५ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक सुशांत चवंडे इच्छुक होते. याचा प्रभागात शिंदे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी हा इच्छुक होता. प्रभाग क्र.१५ मधील महिला आरक्षित जागा भाजपला सोडण्यात आली होती. मात्र भाजपाकडून माजी सुशांत चवंडे हे इच्छुक होते. त्यामुळे शिंदे गटाने भाजपचे माजी नगरसेवक सुशांत चवंडे यांना आपल्या गटात प्रवेश देत उमेदवारी दिली. त्यामुळे माजी आमदार राजन साळवी यांना हा शिंदे गटाकडूनच धक्का बसला आहे. त्यांचा मुलगा अथर्व साळवी याचा पत्ता कट झाला आहे.

Comments are closed.