Rajas Siddiqui Nagpur : रजास सिद्दीकीबाबत धक्कादायक माहिती, रजास उघडपणे करतो काश्मीर आणि पॅलेस्टाईनची तुलना

Rajas Siddiqui Nagpur : रजास सिद्दीकीबाबत धक्कादायक माहिती, रजास उघडपणे करतो काश्मीर आणि पॅलेस्टाईनची तुलना

नागपूर बातम्या: भीमा कोरेगाव प्रकरणात काही वरिष्ठ माओवाद्यांचे पाकिस्तानच्या (Pakistan) आयएसआय सोबत संपर्क असल्याचे समोर आले होते. त्याच पार्श्वभूमीवर रजास सिद्दीकीचे (Rajas Siddique) ही काश्मिरी फुटीरतावाद्यांसोबत संपर्क आहेच. सोबतच त्याचे भारताच्या काही शत्रूंसोबत आंतरराष्ट्रीय संपर्क असल्याची तपास यंत्रणांना शंका असल्याची माहिती एंटी नक्षल ऑपरेशन (ANO) चे स्पेशल आयजी संदीप पाटील यांनी दिली आहे. रजास फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उघडरित्या काश्मीर आणि पॅलेस्टाईनची तुलना करत भारत इस्राएल सारखा अत्याचार करत असल्याचे सांगतो, त्यामुळे रजास सिद्दीकी फक्त एक वरिष्ठ माओवादी कॅडरच नाही, तर त्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन ही असल्याची शंका निर्माण झाली आहे.

माओवादी आणि फुटीरतावादी यांच्यामध्ये आधीपासूनच स्ट्रॉंग कनेक्शन राहिले आहे. आता तर दोन वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आलेल्या पीएफआई आणि माओवाद्यांचे घनिष्ठ संपर्क असल्याचे पुरावे समोर येत आहे, अशी शंका तपास यंत्रणांना आहे. अशातच पीएफआय वर दोन वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली, त्यानंतर त्याचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुसऱ्या संघटनांमध्ये जाऊन पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहे. तपास यंत्रणा आणि सुरक्षा दलांना हे माहित आहे आणि त्यावर काम केले जात असल्याचे ही संदीप पाटील म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर विरोधात समाजमाध्यमवर वादग्रस्त पोस्ट

ऑपरेशन सिंदूर विरोधात समाजमाध्यमवर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर गुप्तहेर यंत्रणांच्या सूचनेवरून नागपूरात रजास सिद्दीकीला नागपुरात अटक करण्यात आली होती. अटकेच्या वेळेला त्याच्यासोबत नागपूरच्या नामांकित विधी महाविद्यालयात एलएलबीच्या पाचव्या सत्रात शिकणारी  एक बिहार मधील तरुणी ही होती. ती रजास सिद्दीकी सारख्या माओवादी विचारसरणीच्या तरुणासोबत असल्यामुळे संबंधित तरुणीला ही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र अजून पर्यंत पोलिसांनी तिला अटक केलेली नाही. मात्र तपास यंत्रणांच्या रडार वर ती तरुणी असल्याचे बोललं जात आहे.

Comments are closed.