ज्येष्ठांचे अश्लिल व्हिडीओ बनवून त्या साईट्सवर अपलोड, सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा कारनामा

जैसलमेर: अलिकडेच जैसलमेरमध्ये एका वृद्धाचा अश्लील व्हिडिओ समोर आला होता. जैसलमेर पोलिसांनी दिल्लीत अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणीला तिच्या प्रियकरासह अटक केली आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली ही तरूणी पैशाच्या लोभापायी तिच्या प्रियकरासह अज्ञात ठिकाणी अज्ञात लोकांसोबत अश्लील व्हिडिओ बनवत होती. त्यानंतर ते व्हिडीओ ती पोर्नोग्राफिक साईट्सना चांगल्या किमतीत विकत होती. जैसलमेरमध्येही या तरूणीने एका वृद्ध पुरूषासोबत असाच व्हिडिओ बनवला आणि तो एका अश्लील साइटवर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जैसलमेर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत गुन्हा दाखल केला आणि तरूणीला तिच्या जोडीदारासह दिल्लीतून अटक केली. (Rajasthan Crime News)

काही दिवसांपूर्वी एका महिलेचा अश्लील व्हिडिओ समोर आला होता. ती महिला तिच्या साथीदारासह कारमधून प्रवास करत असतानाच रस्त्यावरून चालणाऱ्या एका वृद्ध माणसाला थांबवते. ती त्याच्यासोबत अश्लील कृत्ये करते. व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांनी त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची दखल घेत जैसलमेर पोलिसांनी तनोट पोलिस ठाण्यात आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, एसपी सुधीर चौधरी यांनी रूप सिंग इंदा सीओ सिटी, भीमराव सिंग हेड कॉन्स्टेबल इनचार्ज डीसीआरबी/डीएसटी यांना अज्ञात आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. हजारो किलोमीटरपर्यंत या घटनेचा तपास केल्यानंतर, पोलिसांच्या पथकांनी दिल्लीतील एका फ्लॅटमधून या तरूणीला आणि तिच्या जोडीदाराला अटक केली.

पैसे कमविण्यासाठी अश्लील बनवले व्हिडिओ

पोलिसांनी दोघांनाही पकडले आणि जैसलमेरला आणले. चौकशीनंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, व्यवसायाने एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरूणीने तिच्या जोडीदारासह, पैसे कमविण्यासाठी अज्ञात ठिकाणी अज्ञात लोकांसोबत अश्लील व्हिडिओ बनवले होते. मग ती ते व्हिडिओ पोर्नोग्राफिक साईट्सना जास्त किमतीत विकत होती.

आरोपी महिला दिल्लीत वास्तव्यास होती

जैसलमेरमध्ये व्हिडिओ बनवण्यापूर्वी ती सिंगापूर, थायलंड इत्यादी ठिकाणी गेली आणि तिथेही अनेक ठिकाणी असेच व्हिडिओ बनवले होते. जैसलमेरमध्येही एका महिलेने एका वृद्धासोबत असाच व्हिडिओ बनवला आणि पोस्ट केला. यासाठी तिला चांगले पैसे मिळत होते. आरोपी तरूणी दिल्लीत तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती. या कृत्यामध्ये तिला तिचा मित्र साथ देत होता, दोघेही पैसे कमवण्यासाठी अशी कामे एकत्र करायचे अशी माहिती समोर आली आहे.

हे प्रकरण कसे उघडकीस आले?

आजकाल, सोशल मीडियाच्या काळामध्ये कोणताही व्हिडीओ काही मिनिटांतच व्हायरल होतो. या व्हिडिओच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. हा व्हिडिओ इंटरनेटवर पसरताच सामान्य लोकांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वजण थक्क झाले. व्हिडिओमध्ये मुलीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता, परंतु वृद्धाची ओळख स्पष्टपणे दिसत होती. जैसलमेर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी व्हिडिओचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ एक विशेष तपास पथक स्थापन केले. व्हिडिओच्या ठिकाणाचे विश्लेषण करण्यासाठी तांत्रिक गोष्टींचा वापर करण्यात आला. ते ठिकाण तनोट परिसर म्हणून ओळखले गेले आणि साम पोलिस स्टेशनला या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपींना ताब्यात घेतलं.

जैसलमेर पोलिसांच्या सायबर टीमने व्हिडिओच्या मेटाडेटा, सोशल मीडिया पोस्टिंग पॅटर्न, आयपी अॅड्रेस, मोबाईल लोकेशन आणि डिजिटल फिंगरप्रिंट अशा अनेक तांत्रिक बाबींचा सखोल तपास केला. या सर्व प्रयत्नांनंतर, व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण आणि तरूणी दिल्लीचे रहिवासी असल्याचे आणि दोघेही व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचे निश्चित झाले. त्यानंतर, दिल्ली पोलिसांच्या मदतीने, जैसलमेर पोलिसांनी दोघांनाही राजधानीतून ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी जैसलमेरला आणले.

अधिक पाहा..

Comments are closed.