'या' मित्रापासून दूर झाल्याने संजू सॅमसन नाराज..! म्हणाला….
यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League 2025) सुरूवात (22 मार्च) रोजी होणार आहे. शुभारंभ सामन्यातच गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) होणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आयपीएलमध्ये खेळाडूंना सोडण्याच्या नियमावर खूश नाही. त्यांनी ते रद्द करण्याबद्दल वक्तव्य केले आहे.
सॅमसनला त्याचा माजी सहकारी जोस बटलर (Jos Buttler) यंदा त्याच्यासोबत खेळणार नाही याचे दुःख आहे. राजस्थानने त्याला आपल्या संघात कायम ठेवले नाही. आयपीएल मेगा लिलावात गुजरात टायटन्सने बटलरला खरेदी केले. सॅमसन आणि बटलर 7 वर्षे रॉयल्ससाठी एकत्र खेळले, परंतु गेल्या वर्षी लीग लिलावापूर्वी संघाने बटलरला कायम ठेवले नाही.
संजू सॅमसनने एका मुलाखतीत म्हटले आहे की, “आयपीएल तुम्हाला संघाचे नेतृत्व करण्याची आणि सर्वोच्च स्तरावर खेळण्याची तसेच जवळचे मित्र बनवण्याची संधी देते. बटलर माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. आम्ही 7 वर्षे एकत्र खेळलो. या काळात, आमच्या फलंदाजीच्या भागीदारीचा कालावधी इतका मोठा होता की आम्ही एकमेकांना खूप चांगले समजत होतो.” (Sanju Samson Statement About Jos Buttler)
सॅमसन म्हणाला, “तो माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे, जेव्हा जेव्हा मला काही शंका येत असे तेव्हा मी त्याच्याशी बोलायचो. जेव्हा मी कर्णधार झालो (2021 मध्ये), तो माझा उपकर्णधार होता आणि त्याने मला एक चांगला कर्णधार बनण्यास मदत केली. बटलरला जाऊ देणे हा माझ्यासाठी सर्वात कठीण निर्णयांपैकी एक होता.”
Comments are closed.