IPL 2026 – राजस्थानने शेवटच्या षटकात मारलं मैदान, गुजरातचा ६ धावांनी पराभव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएल २०२६ च्या ९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा ६ धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थानने बाजी मारली. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २१० धावा केल्या होत्या. २११ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ २० षटकांत ८ गडी राखून २०४ धावांपर्यंतच पोहोचू शकला. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय असून या विजयासह संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये ६ सामने गुजरात टायटन्सने जिंकले आहेत, तर २ सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजय मिळाला आहे. या आकडेवारीवरून गुजरात टायटन्सचे पारडे जड असल्याचे दिसते. आयपीएल २०२५ मध्ये या दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले होते, ज्यात दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकला होता.

Comments are closed.