गौतम गंभीर सोडणार टीम इंडियाचे प्रशिक्षकपद? आयपीएलमध्ये होणार वापसी! राजस्थानची मोठी ऑफर

भारतीय पुरूष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) मेंटर म्हणून काम पाहिले. २०२४मध्ये केकेआरने विजेतेपद जिंकले, त्यानंतर तो आयपीएलमधून बाहेर पडला. आता पुन्हा एकदा त्याची आयपीएलमध्ये पुनरागमन होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

काही रिपोर्ट्सनुसार, गंभीरला राजस्थान रॉयल्सने तीन मोठ्या पदाची ऑफर दिली आहे. त्यांनी गंभीरला भागीदार, मेंटर आणि सीईओचा प्रस्ताव दिला आहे. राजस्थानचे अधिक भागीदार त्यांचे शेयर नव्या संघ मालकांना विकत आहेत. त्यांच्या नव्या व्यवस्थापकांनी गंभीरला दोन ते तीन टक्के भागीदारीसोबत मेंटर आणि सीईओचा प्रस्ताव दिला आहे.

गंभीर या प्रस्तावाचा सध्या स्विकार नाही करू शकत. तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असल्याने लोढा समितीच्या नियमानुसार, कोणताही एक व्यक्ति आयपीएल आणि भारतीय संघाचे पद एकाच वेळी सांभाळू नाही शकत.

गंभीरला राजस्थानने दिलेल्या प्रस्तावाचा स्विकार करायचा असेल तर त्याला भारताच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यावा लागेल. सध्यातरी त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे विधान आलेले नाही. तसेच भारताच्या प्रशिक्षक पदाचा त्याचा कार्यकाळ २०२७ च्या विश्वचषकापर्यंत आहे. त्याचबरोबर त्याने २०२८ मध्ये भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याचे ध्येय ठेवले आहे.

आयपीएलमधून गंभीरने संन्यास घेतल्यानंतर दोन संघाचे मेंटर म्हणून काम पाहिले आहे. त्याने २०२२ ते २०२३मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर राहिला.

सध्या भारतीय संघाचा हा प्रशिक्षक टी२० विश्वचषक २०२६मध्ये व्यस्त आहे. संघाने यूएसए, नामिबिया आणि पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेची पुढची फेरी गाठली आहे. सुपर-८मध्ये ते दक्षिण आफ्रिका (२२ फेब्रुवारी) आणि वेस्ट इंडिज (१ मार्च) विरुद्ध खेळणार हे निश्चित झाले आहे. तसेच भारताचा ग्रुपमधील एक सामना बाकी आहे, जो १८ फेब्रुवारीला नेदरलॅंड्सविरुद्ध आहे.

Comments are closed.