RR vs PBKS: पंजाबचं प्लेऑफचं गणित बिघडवणार का राजस्थान? जाणून घ्या हेड टू हेडमध्ये कोण वरचढ

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज दोन सामने खेळले जाणार आहेत. जिथे पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स समोरासमोर असतील. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघ आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यादरम्यान आता राजस्थान पंजाबच्या आशांवर पाणी फिरवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे पंजाब प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचा प्रयत्नाने मैदानात उतरेल. श्रेयसच्या नेतृत्वाखाली पंजाब 15 गुणांनी सध्या पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच राजस्थान 6 गुणांनी नवव्या स्थानावर आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर असणार आहे. जिथे सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. हवामान बघता फलंदाजी करणे दोन्ही संघांसाठी फायदेशीर असेल. दोन्ही संघांमधील हेड रेकॉर्ड्स बघितल्यावर राजस्थानचं पारडं जडं आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 29 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 17 सामने राजस्थान तसेच पंजाबने फक्त 12 सामने जिंकले आहेत.

त्यामुळे पंजाबच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांवर राजस्थान अडचण ठरेल का? की पंजाब आज राजस्थानवर वरचढ ठरेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Comments are closed.