फायनलमध्ये कॅप्टन रजत पाटीदारचा सुपरहिट शो! ठोकलं वादळी शतक अन् रचला इतिहास, निवडकर्त्यांना दिल
दुलेप ट्रॉफी अंतिम व्हिडिओमध्ये रजत पाटीदार शतक: आयपीएल 2025 चा विजेता कर्णधार रजत पाटीदार दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही धडाकेबाज फॉर्ममध्ये दिसत आहे. सेंट्रल झोनसाठी (South Zone vs Central Duleep Trophy 2025 Final) खेळताना त्याने शानदार शतक ठोकले. सेंट्रल झोनचा कर्णधार म्हणून रजत पाटीदारने खऱ्या अर्थाने नेतृत्व दाखवत पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. इतकेच नव्हे तर संघाचा मधल्या फळीतला फलंदाज यश राठोड यानेही दमदार खेळी करत शतक ठोकले.
युनिव्हर्सिटीने ड्युप्युरमधील ड्यूपरमध्ये रेपेट्स ट्रॉफीला धडक दिली.
फायनल सामन्याच्या पहिल्या डावात साऊथ झोनची अवस्था खूपच खराब झाली होती, आणि ही टीम केवळ 149 धावांत गारद झाली. त्यानंतर सेंट्रल झोनच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. कर्णधार रजत पाटीदारने फक्त 112 चेंडूत शतक झळकावले. त्याने 115 चेंडू खेळत 2 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या आणि तो बाद झाला.
यश एक यश रॅम रथोड chepeed trhhe आहे)
रजत पाटीदारनंतर सेंट्रल झोनसाठी पहिल्या डावात यश राठोडनेही तुफानी कामगिरी करत शतक ठोकले. बातमी लिहिली जात असताना तो 103 धावा करून क्रीजवर नाबाद होता. या संघाने पहिल्या डावात 5 बाद 321 धावा केल्या होत्या आणि आतापर्यंत 172 धावांची आघाडी मिळवली आहे.
रजत पाटीदारच्या नावावर सर्वाधिक धावा (Rajat Patidar Highest run-scorer in Duleep Trophy 2025)
फायनलच्या पहिल्या डावात शतक ठोकल्यानंतर रजत पाटीदार हा दिलीप ट्रॉफी 2025 मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत 4 डावांत 122.6 च्या सरासरीने सर्वाधिक 368 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 102.82 इतका राहिला आहे. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 2 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकली आहेत.
त्या क्षणी जेव्हा रजत पाटीदारने आपले 💯, फक्त 112 चेंडूंच्या बाहेर आणले 🙌
सेंट्रल झोनच्या कर्णधार समोरच्या दिशेने गेला आणि एक भव्य 101 (115) 🧢🔥 दाबा
स्कोअरकार्ड ▶ ️ https://t.co/unz0hj66ye#ड्युलेप्ट्रोफी | #अंतिम | @Idfcfirstbank pic.twitter.com/fwnb0ryssq
– बीसीसीआय घरगुती (@बीसीडोमिस्टिक) 12 सप्टेंबर, 2025
भारतासाठी आतापर्यंत खेळले तीन कसोटी सामने (Rajat Patidar played 3th Test matches for India)
रजत पाटीदार सध्या टीम इंडियाच्या बाहेर आहे, पण त्याने भारतासाठी तीन कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने सहा डावांमध्ये फक्त 63 धावा केल्या. कदाचित यामुळेच त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 2024 मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला तेव्हा रजतला पदार्पणाची संधी मिळाली. त्याने त्याच मालिकेत त्याची शेवटची कसोटीही खेळली. त्यानंतर तो पुनरागमन करू शकला नाही.
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने जिंकले आयपीएलचे विजेतेपद (Rajat Patidar RCB won IPL title)
रजत पाटीदारने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण करताना भारतासाठी एक वनडेही खेळला आहे. या वर्षीचा आयपीएलही रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने जिंकला आहे, जरी त्यानंतरही, रजतला अद्याप टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी पदार्पण करता आलेले नाही. पण, त्याचे टी-20 आकडे बरेच चांगले आहेत. आता हे पाहायचे आहे की अशा कामगिरीनंतर बीसीसीआय निवड समिती रजतची दखल घेईल की त्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.