ये कोई मजाक नहीं! शेतकऱ्याच्या ‘या’ पोराला सतत फोन करत होता विराट कोहली, कारण ऐकून थक्क व्हाल
Rajat Patidar Sim Card : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याच्यासोबत एक भन्नाट आणि अजब-गजब घटना घडली. या घटनेमुळे सध्या गावाकडच्या मुलाला थेट भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. इतकंच काय, त्याला आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयाल आणि स्वतः कर्णधार रजत पाटीदार यांच्याशीही फोनवर बोलत होता.
काय आहे नेमकं प्रकरण?
देवभोग पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या माडागावमध्ये ही गोष्ट घडली. शेतकरी गजेंद्र याचा मुलगा मनीष, 28 जून रोजी गावातील मोबाईल सेंटरमध्ये नवीन सिम घेण्यासाठी गेला. दुकानातील शिशुपाल नावाच्या व्यक्तीने नियमित प्रक्रियेनंतर त्याला एक नंबर दिला. मनीषने आपल्या मित्र खेमराजसोबत त्या सिमवर व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केले, आणि आश्चर्य म्हणजे डीपीवर रजत पाटीदारचा फोटो दिसत होता.
दोन आठवडे सतत फोन कॉल्स….
सुरुवातीला त्यांनी हे कसलंतरी टेक्निकल प्रॉब्लम समजून दुर्लक्ष केलं. पण दोन दिवसांनी अज्ञात नंबरवरून फोन येऊ लागले, कोणी म्हणत होतं “मी विराट कोहली बोलतोय”, तर कोणी “मी यश दयाल”, तर कोणी “मी एबी डिव्हिलियर्स”. क्रिकेटप्रेमी असलेल्या मनीष आणि खेमराजला वाटलं मित्र मंडळी थट्टा करतायत, म्हणून तेही मस्करीत बोलू लागले. हे 15 जुलैपर्यंत चालू राहिले. मग एके दिवशी रजत पाटीदारने स्वतः फोन केला.
रजत पाटीदारचा आला फोन अन्….
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर, पाटीदार याने स्वतः मनीष आणि हेमराज यांना फोन केला, ज्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की हा स्टार क्रिकेटपटू त्यांना फोन करत आहे आणि त्यांनी एक मजेदार उत्तर दिले. रजत फोनवर म्हणाला, ‘भाऊ, मी रजत पाटीदार आहे, तो नंबर माझा आहे, कृपया तो परत करा’. त्यावर तरुणांनी उत्तर दिले ‘आणि आम्ही एमएस धोनी आहोत’. सुरुवातीला तरुणांनी ते विनोद म्हणून घेतले, पण जेव्हा रजत म्हणाले की, तो पोलिसांना पाठवेल आणि 10 मिनिटांत पोलिस प्रत्यक्षात पोहोचले. त्यानंतर दोन्ही तरुणांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांना समजले की ही विनोद नव्हता, तर त्यांनी खरोखर कोहली आणि डिव्हिलियर्सशी बोलले होते. दोन्ही मित्रांनी लगेच सिम कार्ड परत केले.
नंबर 90 दिवस बंद राहिला अन्…
रजत पाटीदारचा नंबर 90 दिवस वापरात नसल्याने कंपनीने तो नवीन ग्राहकाला देऊन टाकला होता. प्रकरण एमपी सायबर सेलपर्यंत पोहोचलं आणि गरियाबंद पोलिसांच्या मदतीने सिम मनीषकडून घेऊन रजत पाटीदारला परत देण्यात आलं.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.