कर्णधारपद सांभाळताच रजत पाटीदारची शतकी खेळी, रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामाची शानदार सुरुवात
यंदाचा (2025-26) रणजी ट्रॉफी हंगाम 15 ऑक्टोबरपासून रोजी सुरू झाला आहे, ज्यामध्ये अनेक खेळाडू टीम इंडियामध्ये स्थान मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. त्यापैकी रजत पाटीदार हा या हंगामात मध्य प्रदेश संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने रणजी ट्रॉफी हंगामाची सुरुवात शानदार केली आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात रजत पाटीदारची फलंदाजी प्रभावी होती त्याने 160 चेंडूत शतक झळकावले.
रजत पाटीदारने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 16वे शतक झळकावले.
मध्य प्रदेशने 2025-26 रणजी ट्रॉफी हंगामासाठी शुभम शर्माच्या जागी रजत पाटीदारला कर्णधार म्हणून घोषित केले. पाटीदारची सुरुवात शानदार झाली आहे. पाटीदारच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश संघाने इंदूरमध्ये खेळाच्या पहिल्या दिवशी पंजाबला 232 धावांवर गुंडाळले. दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशने 155 धावांत चार गडी गमावले. रजत पाटीदारने एका टोकापासून डावाची धुरा सांभाळली आणि दिवसअखेर 107 धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीत आणले.
राजत पाटीदारच्या शानदार शतकामुळे मध्य प्रदेशला दुसऱ्या दिवसअखेर पंजाबविरुद्ध पहिल्या डावात 73 धावांची आघाडी मिळाली. यामुळे सामना अनिर्णित राहिल्यास त्यांना गुण मिळवण्याची संधी मिळते. गेल्या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये रजत पाटीदार मध्य प्रदेशसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता, त्याने 529 धावा केल्या.
Comments are closed.