सुशील हगवणे गाडीतून उतरलाच नाही, राजेंद्र हगवणेंना म्हणालो मुक्कामाला थांबा, पण…. साताऱ्यात क
राजेंद्र हागावणे पुणे न्यूज: वैष्णवी हगवणे हिच्यावर अनन्वित छळ करणारा अजितदादा गटाचा बडतर्फ पदाधिकारी राजेंद्र हगवणे याच्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे फरार झाला होता. जवळपास सात दिवस हे बाप-बेटे पोलिसांपासून (Pune Police( वाचण्यासाठी फिरत होते. सुनेचा हुंडाबळी घेणाऱ्या हगवणेची फरार असताना अक्षरशः बडदास्त ठेवली गेल्याचे पुरावे ‘एबीपी माझा’च्या हाती लागलेत. सात दिवस तो पुण्यापासून साताराबेळगावपर्यंत मोकाट फिरत होता. यावेळी राजेंद्र हगवणे याला थार, बलेनो, एन्डेव्हर या गाड्या पुरवण्यात आल्या. तो जाईल तिथे मित्रमंडळींनी आपली फार्महाऊस, घरं त्याच्यासाठी उघडल्याचं समोर आलं आहे.
याप्रकरणी आता साताऱ्यातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे साताऱ्यातील ज्या फार्म हाऊसवर थांबले होते, तेथील मालक अमोल जाधव ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. राजेंद्र हगवणे फरार झाल्यानंतर साताऱ्यातील पुसेगाव येथील शेतात थांबले होते. या फार्म हाऊसच्या मालकांनी सांगितले की, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे इथे आले तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत होते. ते काही वेळ शेतात थांबले होते. राजेंद्र हगवणे इथे आले होते. आम्ही तेव्हा आंबे उतरवण्याचे काम करत होतो. राजेंद्र हगवणे एकटेच गाडीबाहेर आले होते. ते फार काही बोलले नाही, तेव्हा पाऊस येत होता. ते थोडावेळ थांबले आणि निघून गेले. बैलगाडा शर्यतीमुळे आमची ओळख होती. 19 तारखेला संध्याकाळी साडेचार पाच वाजता ते आले होते. या शेताच्या मालकांच्याकडे राजेंद्र हगवणे यांचे शर्यतीचे बैल संभाळण्याकरता ठेवलेले आहेत. याच ओळखीतून ते काही काळ त्यांच्या या शेतात थांबले होते. यानंतर इथून ते निघून गेल्याचं शेतमालक अमोल जाधव यांनी सांगितले.
बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने ते इकडे येत असतात. त्यांचे बैल आमच्याकडे आहेत. आम्हाला वाटले त्यासाठीच आले असतील. सुशील हगवणे गाडीतच बसले होते. राजेंद्र हगवणे एकटे गाडीबाहेर आले होते. मी त्यांना विचारलं मुक्काम करा. ते नाही म्हणाले. ते थोडे चिंतेत आणि घाबरल्यासारखे वाटत होते. काहीवेळ थांबून ते निघून गेले, असे हगवणे यांचे बैल सांभाळणाऱ्या व्यक्तीने सांगितले. ते इकडे आले तेव्हा या सगळ्या प्रकरणाबद्दल माहिती नव्हते. ते निघून गेल्यानंतर त्यांचा घाबरलेला चेहरा पाहून मी जरा दुसरीकडे विचारपूस केली तेव्हा आम्हाला सगळा प्रकार समजला. माझी सुशील हगवणे यांच्याशी ओळख आहे. महिन्यातून एकदा ते इकडे यायचे, असे बैल सांभाळणाऱ्या व्यक्तीने सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=_4ahiao4h0i
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.