रजनीकांतचा ‘कुली’ 14 ऑगस्टला येतोय!
रजनीकांतचा बहुचर्चित ‘कुली’ चित्रपट येत्या 14 ऑगस्ट 2025 ला सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू आहे. या चित्रपटाला 100 हून अधिक देशांत प्रदर्शित केले जाणार आहे. या चित्रपटात रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असून बॉलीवूड अभिनेता आमीर खान, नागार्जुन, सत्यराज, उपेंद्र, सौबिन शाहिर आणि श्रुति हासन हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. ‘कुली’ चित्रपटाची कथा वेगळीच असून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणारी आहे, असे निर्मात्याने म्हटले आहे.
Comments are closed.