माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न, पण मी हरलेलो नाही! राघव चड्डा यांची ‘आप’मधील फेरबदलानंतर पहिली प्र
दिल्ली: आम आदमी पार्टीमध्ये (AAP) अलीकडेच झालेल्या फेरबदलानंतर राज्यसभा खासदार राघव चड्डा (rajyasabha mp raghav chadha) यांनी पहिल्यांदाच आपली उघड प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने त्यांना राज्यसभेतील उपनेते (Deputy Leader) पदावरून हटवल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया एक्स X वर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या वेगाने व्हायरल होत आहे. राघव चड्डा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या शांततेचा अर्थ माझा पराभव समजू नका. मला गप्प करण्यात आले आहे, पण मी हरलेलो नाही.” गेल्या काही काळापासून राघव चड्डा यांची शांतता आणि पक्षाच्या मोठ्या निर्णयांपासून असलेली त्यांची दुरी यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. राघव चड्डा यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “मला जेव्हा जेव्हा संसदेत बोलण्याची संधी मिळते, तेव्हा मी जनतेचे मुद्दे मांडतो. जनतेचे मुद्दे मांडणे हा काय गुन्हा आहे का? मी काही पाप केले आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (rajyasabha mp raghav chadha)
शांत, पराभूत नाही
'आम आदमी'ला माझा संदेश
–
मी गप्प बसलो आहे, माझा पराभव झाला नाही'सामान्य माणसांना' माझा संदेश pic.twitter.com/poUwxsu0S3
— राघव चढ्ढा (@raghav_chadha) 3 एप्रिल 2026
Raghav Chadha: ‘मी जनतेच्या मुद्द्यांवर बोलतो…’
राघव चड्डा म्हणाले, “मी हे प्रश्न यासाठी विचारत आहे कारण आम आदमी पार्टीने पार्लमेंटला (संसदेला) सांगितले आहे की, संसदेत राघव चड्डा यांना बोलण्याची संधी दिली जाऊ नये. कोणाला माझ्या बोलण्यावर बंदी का घालायची असेल? मी तर जेव्हा बोलतो, तेव्हा जनतेच्या मुद्द्यांवर बोलतो, आम आदमीबद्दल बोलतो.”(rajyasabha mp raghav chadha)
Raghav Chadha: ‘माझ्या शांततेला माझा पराभव…’
राघव चड्डा यांनी भावनिक स्वरात म्हटले, “मी एअरपोर्टवर मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांवर बोललो, झोमॅटो-ब्लिंकिटच्या डिलिव्हरी रायडर्सच्या समस्या मांडल्या, अन्नातील भेसळीचा मुद्दा उपस्थित केला आणि टोल प्लाझाच्या लूटीपासून ते बँक चार्जेसच्या लूटीपर्यंतचे विषय मांडले. इतकेच नाही तर मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा, कंटेंट क्रिएटर्सवर स्ट्राइक का केली जाते, टेलिकॉम कंपन्या १२ महिन्यांत आपल्याकडून १३ वेळा रिचार्ज कसं करून घेतात, डेटा रोल ओव्हर का देत नाहीत, रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग कॉल का थांबवले जातात, असे सर्व मुद्दे मी सभागृहात मांडले.” त्यांनी पुढे म्हटले की, हे मुद्दे मांडल्यानंतर देशातील सामान्य माणसाचा तर फायदा झाला, पण यामुळे आम आदमी पार्टीचे काय नुकसान झाले? कोणाला मला बोलण्यापासून का रोखायचे असेल? कोणाला माझा आवाज का दाबून टाकायचा असेल? असा सवालही राघव चड्डा यांनी उपस्थित केला आहे.(rajyasabha mp raghav chadha)
राघव चड्डा यांनी जनतेला संबोधित करताना म्हटले, “तुम्ही लोक मला भरभरून प्रेम देता. मी जेव्हा जेव्हा तुमचे मुद्दे मांडतो, तुम्ही मला साथ देता, माझे कौतुक करता, माझा उत्साह वाढवता. मला तुम्हाला थँक्यू म्हणायचे आहे. असाच माझा हात आणि माझी साथ धरून ठेवा, सोडू नका. मी तुमच्यामुळे आहे आणि तुमच्यासाठी आहे. ज्या लोकांनी आज पार्लमेंटमध्ये माझा बोलण्याचा अधिकार हिरावून घेतला, मला शांत केले, मला त्यांनाही काही सांगायचे आहे. माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका. माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका.” (rajyasabha mp raghav chadha)
व्हिडिओच्या शेवटच्या भागात राघव म्हणाले, “माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका. मी तो सागर आहे, जो वेळ आल्यावर वादळ बनतो. जय हिंद.”
Raghav Chadha: राज्यसभेतील पक्षाच्या उपनेते पदावरून हटवण्यात आले
आम आदमी पार्टीने (AAP) राज्यसभेत मोठा संघटनात्मक बदल केला आहे. पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्डा (Raghav Chadha) यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेते पदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी आता अशोककुमार मित्तल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या बदलानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
राघव चढ्ढा : राघव चढ्ढा यांचा धाकटा भाऊ राज्य मुक्काम
राघव चड्डा हे आम आदमी पार्टीच्या तरुण आणि आक्रमक नेत्यांपैकी एक मानले जातात.
2020 – 2022: दिल्ली विधानसभेचे सदस्य (आमदार).
दिल्ली जल बोर्ड: सदस्य म्हणून कामाचा अनुभव.
एप्रिल 2022: पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड.
आणखी वाचा
Comments are closed.