रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भ
रक्षा खदसे: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणातील आरोपी हे शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction) कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येत आहे. तर आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला दाखल झाल्या आहेत. रक्षा खडसे यांच्या मुलीसह युवतींची छेडछाड करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या महिलांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालकही चिंतेत आहेत. समाजातील अशा विकृतींवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. यापूर्वी जळगावमध्ये “रोडरोमियो विरोधी मोहीम” राबवण्यात आली होती. त्याच धर्तीवर मुक्ताईनगरमध्येही कठोर उपाययोजना करून आरोपींना धडा शिकवावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
आमचा पक्ष विकृतीला समर्थन देत नाही
याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, या आरोपींना अटक केली आहे. त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार उदयास यायला नको. केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्या लेकीसोबत जरा असा प्रकार घडत असेल तर इतर महिलांचे कसे होणार? यात पक्षाचा उल्लेख केला जात आहे. पण कुठलाही नेता आपल्या कार्यकर्त्यांना सांगत नसतो की, मुलींची छेड काढा. शिवसेना हा मुलींच्या सुरक्षेसाठी ओळखला जाणारा पक्ष आहे. आमचा पक्ष विकृतीला समर्थन देत नाही. छेडछाडीच्या प्रकरणात अनेक महिला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करत नाही. मात्र, रक्षाताई खडसे यांनी पुढाकार घेत तक्रार दाखल केली त्यामुळे आम्ही त्यांचे कौतुक करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.