रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना

रक्षा खदसे: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांपैकी तीन जणांना अटक केली असली तरी अद्यापही उर्वरित आरोपी फरार असल्याने पोलिसांना मोठी नामुष्की सहन करावी लागत आहे.

मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांचा विरोधात गुन्हा दाखल केला होता, यातील तीन जणांना अटक तर एक अल्पवयीन ताब्यात घेत त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली होती. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र पीयूष मोरे, चेतन भाई आणि सचिन पालवे हे तिघे जण पोलिसांनी शोध घेऊनही सापडू शकले नसल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनले आहेत.

आरोपी सापडत नसल्याने पोलिसांवर नामुष्की

मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढणाऱ्यांपैकी काही जण हे शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याने या प्रकरणात राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या चर्चा रंगल्या होत्या. माजी नगरसेवक पीयूष मोरे हा सध्या फरार आहे. तो पूर्वी भाजपचा कार्यकर्ता राहिला आहे तर सध्या शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा तो समर्थक आहे. छेडखानीची घटना घडून दहा दिवसाहून अधिक काळ उलटला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असली तरी तीन जण अद्यापही फरार आहे. दहा दिवसांहून अधिक कालावधी होऊन पोलिसांना आरोपी सापडू न शकल्याने पोलिसांना नामुष्की सहन करावी लागत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्या होत्या. यानंतर या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) सात पैकी चार जणांना ताब्यात घेण्यात आले. यात एका अल्पवयीन बालकाचाही समावेश आहे. अनुज पाटील, अनिकेत भोई, किरण माळी, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टवाळखोरांची नावे आहेत. तर इतर तीन आरोपी पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?

अधिक पाहा..

Comments are closed.