राम गोपाल वर्माची जीभ घसरली, कियारा आडवाणीचा बिकीनीतील फोटो शेअर करत केली आक्षेपार्ह कमेंट

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि वादग्रस्त वक्तव्य हे समिकरणच झालं आहे. राम गोपाल वर्मा यांनी आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी हिच्याबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला खडे बोल सुनावले. त्यानंतर वर्मा यांनी ती पोस्ट डिलीट केली.
https://www.youtube.com/watch?v=9dve2vmov5u
कियारा आडवाणी, ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांची मुख्य भूमिका असलेल्या वॉर 2 या चित्रपटाचा टीझर आज रिलीज करण्यात आला. एनटीआरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा टीझर रिलीज केला. या चित्रपटात कियारा आडवाणीने बिकीनी घातली आहे. तिचा तो बिकीनीतला सिन रामगोपाल वर्माने शेअर करत त्यावर आक्षेपार्ह कमेंट लिहली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी राम गोपाल वर्माला चांगलेच धारेवर धरले.
Comments are closed.