देवाच्या नावाने 'राम रामपती बँक'
तुम्ही आतापर्यंत खासगी आणि सरकारी बँकांकडून कर्ज घेतले असेल, तेथे स्वत:कडील बचतही साठविली असेल, परंतु कधी भगवान श्रीरामाशी संबंधित बँक असल्याचे ऐकले आहे का? वाराणसीत एक अशी बँक आहे, जेथे राम नामाला कागदावर उतरविले जाते आणि मग त्याला जमा केले जाते. 98 वर्षांपासून सुरू असलेल्या बँकेचे लाखो खातेधारक आहेत. परंतु आजवर या बँकेत एक रुपयाही जमा झालेला नाही. रुपयाच्या स्वरुपात येथे पुण्य जमा होते आणि कर्जाच्या नावावर मिळते राम नाम. याला राम रमापतिची बँक म्हटले जाते. ही बँकन वाराणसीच्या त्रिपुरा भैरवी येथे असून तिला 98 वर्षे पूर्ण झाली आहेत. येथे शेकडोंच्या संख्येत पिशव्या असून त्यात रुपये नव्हे तर राम नाम लिहिलेले कागद आहेत. या कागदांची संख्या लाखोंमध्ये आहे. या बँकेत रितसर कर्मचारी देखील असून ते येणाऱ्या लोकांचे खाते उघडण्यापासून दुसऱ्या प्रक्रिया पूर्ण करतात. बँकेत ग्राहकांसाठी अर्जही असून तो भरणे आवश्यक आहे. अर्जावर नियम नमूद असून यात रामभक्ताचे नाव आणि पत्ता नमूद करावा लागतो. तसेच व्यक्तीच्या राम नामाच्या कर्जाचे कारणही सांगावे लागते तसेच मनातील इच्छाही मांडावी लागते.
परदेशी नागरिक सदस्य
राम रमापति बँकेचे 10 टक्के सदस्य विदेशी नागरिक आहेत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दुबई इत्यादी देशांचे सदस्य देखील येथे येत असतात. याचबरोबर नेपाळ, सिंगापूर, इंग्लंड, अमेरिका इत्यादी देशांचे लोकही या अनोख्या बँकेचे सदस्य आहेत.
राम नाम लिहिण्याचे नियम
भरण्यात आलेल्या शपथपत्रानुसार कर्ज घेणाऱ्या भाविकाला 8 महिने 10 दिवसांपर्यंत प्रतिदिन सातत्याने 500 राम नाम लिहावे लागतात, अशाप्रकारे 250 दिवसांमध्ये 1.25 लाखवेळा राम नाम लिहिले जाईल. यादरम्यान भाविकांना केवळ सात्विक भोजनच करावे लागते. कागद, पेन सर्वकाही बँकेकडून मोफत पुरविले जाते. स्नान केल्यावरच राम नाम लिहावे लागते, त्यानंतर दैनंदिन कामावर जाता येते. 8 महिने 10 दिवस पूर्ण होताच विधिवत पूजा करत राम नाम बँकेत जमा करण्यात येतात.
आतापर्यंत इतकी राम नामावली
बँकेत कर्जाच्या स्वरुपात 1.25 लाख जय श्री रामाचे कर्ज दिले जाते. जे भाविकांना नियमानुसार भरावे लागते. यासाठी बँक भक्तांना राम बुकपासून पेन देखील देते. या बुकला ब्रह्ममुहुर्तात भरावे लागते. असे केल्यास राम नामाचे कर्ज पूर्ण करत बँकेत परत जमा केल्यास व्याजाच्या स्वरुपात मनोकामना पूर्ण होतात. बँकेत आतापर्यंत 19 अब्ज 39 कोटी 59 लाख 25 हजाराहून अधिक राम नामावली जमा झाली आहे. येथे रामभक्त दरवर्षी राम नवमीला स्वत:चे खाते उघडण्यासाठी पोहोचतात.
राम रमापति बँकेत कसे पोहोचाल?
पत्ता: डी 5/35, त्रिपुरा भैरवी, दशाशवमेहे, वाराणसी -2
वाराणसी जंक्शन रेल्वे स्थानकावरून (सुमारे 4 किमी)
ऑटो किंवा टॅक्सीने : थेट दशाश्वमेध घाटासाठी ऑटो किंवा टॅक्सी पकडा, तेथून त्रिपुरा भैरवी भागाच्या दिशेने चालावे.
सार्वजनिक वाहतूक सेवेतून : गोडौलिया किंवा दशाश्वमेध घाटासाठी लोकल बस पकडा, तेथून त्रिपुरा भैरवीच्या दिशेने पायी चाला.
Comments are closed.