अजित पवार मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायेत, ‘त्या’ वक्तव्यावरुन राम शिंदेंचा पलटवार

अजित पवारावरील राम शिंदे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल आमदार रोहित पवार यांना उद्देशून भावकीचा विचार केला नसता तर रोहित तू आमदार झाला नसतास असं वक्तव्य केलं होतं. आता याच वक्तव्यावरुन भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे  (Ram Shinde) यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. अजित पवार ते वक्तव्य करून सातत्याने मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबतीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असे राम शिंदे म्हणाले. अजित पवार हे वक्तव्य सातत्याने पुन्हा पुन्हा करून शिळ्या कढीला उत का आणतायेत? असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केलाय.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भावकी काढून काका अजित पवार यांनी डिवचल्यानंतर अजित पवार यांनीही भावकीमुळे तू आमदार झालास म्हणत पलटवार केला. रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळ्यासाठी एकत्र आले होते. यावेळी चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली.

रोहित पवार यांनी व्यासपीठावरून पहिल्यांदा बोलताना दादा गावकीचा विचार करतात. मात्र, भावकीला विसरले असा सणसणीत टोला लगावला होता. रोहित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये चांगलीच फटकेबाजी केली. यानंतर अजित पवार व्यासपीठावर बोलायला उभे राहिल्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा रोहित पवारांच्या भावकीचा संदर्भ घेत चांगलाच पलटवार केला आणि माझ्या नादाला लागू नका, असा हसत हसत इशारा दिला. रोहित म्हणाला की दादांचे गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे लक्ष नाही. अजित पवार म्हणाले की भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास. आपण बॅलेट पेपरवर निवडून आला आहे, जयंत पाटील जरा त्यांना सांगा असे म्हणत रोहित पवार यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार केला. ते म्हणाले की मी महायुतीमध्ये गेल्यापासून तुमच्या कुणावर टीका केली आहे का? तुमच्या तुम्ही तुमच्या विचाराने चालत आहात. मी माझ्या विचाराने चाललो असल्याचे सांगत अजित पवार यांनी माझ्या नादाला लागू नका असा इशारा दिला.

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar on Rohit Pawar: माझ्या नादाला लागू नका! लय चुरूचुरू बोलू नको, भावकीनं लक्ष दिलं म्हणून निवडून आलास, अजितदादांचा रोहितदादाला हसत हसत दम

आणखी वाचा

Comments are closed.