“रमीझ राजा पुन्हा ट्रोल्सच्या निशाण्यावर, रोनाल्डोच्या आहाराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खिल्ली!”
चॅम्पियन्स ट्रॉफीवरील एका कार्यक्रमात पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि युनूस खान यांनी माजी पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांची खिल्ली उडवली होती. त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकानेही त्यांना पाठिंबा दिला होता. या कार्यक्रमात माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजाही त्यांच्यासोबत होते. रमीझ राजा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात म्हटले होते की, रोनाल्डोचा डाएट प्लॅन नासाने तयार केला आहे.
रमीझ राजा यांनी एका शोमध्ये एक विचित्र विधान केले होते. त्यांनी असा दावा केला होता की नासा हे पोर्तुगीज महान फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा डाएट प्लॅन तयार करते. यापूर्वी, या विधानाबद्दल खूप मजा आली होती. आता वसीम अक्रमने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी होत असलेल्या शोमध्ये त्या विधानाद्वारे रमीझ राजा यांची खिल्ली उडवली.
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की अजय जडेजा काहीतरी बोलत होते तेव्हा वसीम अक्रम म्हणतात की, “मी असं ऐकले आहे की रोनाल्डोचा डाएट प्लॅन नासा तयार करतात” यावर तिथे उपस्थित असलेल्या शोचा होस्ट म्हणतो हो एकदा ते असे म्हणले होते. मग ते वकार युनूस यांना विचारतात की असे कोण म्हंटले होते.
जेव्हा वकार युनूस यांना विचारले की हे कोणी म्हटले तेव्हा वकार म्हणतात की, मी हे फक्त ऐकले, मला माहित नाही की ते कोणी म्हटले. वसीम अक्रम आणि वकार मोठ्याने हसतात. कारण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला नाव माहिती असते पण कोणीच स्पष्ट काही म्हणत नाही.
पाकिस्तान क्रिकेट संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान आहे पण ते स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा कोणताही सामना न जिंकणारा तो पहिला यजमान संघ ठरला. त्याने पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध आणि दुसरा भारताविरुद्ध गमावला, त्याचा तिसरा सामना बांगलादेशविरुद्ध होता जो पावसात वाया गेला.
महत्वाच्या बातम्या :
क्रिकेट सोडलं पण पैसा नाही! इरफान पठाणच्या कमाईचा भन्नाट फॉर्म्युला
रणजी फायनलमध्ये करुण नायरचा जलवा, दमदार शतकाने विदर्भ जेतेपदाच्या उंबरठ्यावर!
दक्षिण आफ्रिकेची विजयी झेप! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश
Comments are closed.