खासदाराच्या गाडीवर टायरं फेकली, आधी घरी जाऊन तोडफोड; करणी सेनेचे कार्यकर्ते ताब्यात
अलिगढ : उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये समाजवादी पक्षाचे खासदार (MP) रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. करणी सेना आणि क्षत्रीय महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार रामजीलाल यांच्या ताफ्यावर टायरं फेकल्याने मोठा गोंधळ उडाला. अलिगढच्या गभाना टोल प्लाझाजवळ मोठ्या संख्येने करणी सेनेचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. त्यावेळी, खासदार रामजीलाल यांचा ताफा जात असताना, या कार्यकर्त्यांनी खासदार महोदयांच्या गाडीवर टायरं फेकली. त्यामुळे, ताफ्यातील कार एकमेकांवर धडकल्या. या घटनेनंतर पोलिसांनी (police) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.
हा टोल असून पोलीस प्रशासनाने आम्हाला इथं थांबवलं आहे. हे प्रकरण गंभीर आहे, बुलंदशहरमध्ये दलितांवरील अत्याचाराच्या 6 घटना घडल्या आहेत. उत्तरप्रदेशमध्ये या घटनांनी संतापाची लाट उसळली आहे. दलित अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्यांचे लग्न मोडले जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची तोडफोड केली जात आहे, असे रामजीलाल सुमन यांनी या हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले. दरम्यान, खासदार सुमन यांना पोलिसांनी वापस आग्र्याला जाण्याचे सूचवले. तसेच, अलिगढ जिल्ह्यातील हाथरस सीमारेषेपर्यंत पोलिसांनी त्यांना सोडले आहे.
सपा खासदार रामजीलाल सुमन यांनी संसदेत राणा सांगा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, करणी सेना आणि इतर संघटनांनी खासदार सुमन यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार महोदयांच्या आग्र्यातील घरात जाऊन तोडफोडही केली होती. या हल्ल्यानंतर खासदार रामजीलाल सुमन यांनी माझ्या व कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याचे म्हटले. त्याअनुषंगाने उच्च न्यायालय आणि उपराष्ट्रपतींना पत्र लिहून कळवले आहे. त्यानंतर, त्यांच्या घराजवळ पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आज अलिगढमध्ये त्यांच्या ताफ्यातील वाहनांवर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला.
हेही वाचा
पाकिस्तानचं पाणी बंद केलं नाही, सरकार खोटं बोलतंय; प्रकाश आंबेडकरांनी दाखवलं पत्र
अधिक पाहा..
Comments are closed.