चेन्नई सुपर किंग्ससाठी आनंदाची बातमी! हार्दिक पांड्यासारखा खेळणारा खेळाडू आता CSK च्या ताफ्यात
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये महाराष्ट्राचा स्टार अष्टपैलू खेळाडू रामकृष्ण घोषने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीने त्याने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे त्याला आता ‘पुढचा हार्दिक पांड्या’ (Hardik pandya) म्हटले जात आहे. चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याला रिटेन केले असून, आयपीएल 2026 पूर्वी त्याचा हा फॉर्म पाहून संघ व्यवस्थापन खूप आनंदी असेल.
महाराष्ट्राने आतापर्यंत 4 सामने खेळले असून रामकृष्ण घोषने प्रत्येक सामन्यात छाप पाडली आहे.
उत्तराखंड विरुद्ध त्याने 31 चेंडूत 47 धावा (4 चौकार, 2 षटकार) आणि गोलंदाजीत 6 षटकांत 24 धावा देऊन 2 बळी घेतले. याच सामन्यात ऋतुराज गायकवाडनेही (Ruturaj gaikwad) 124 धावांची खेळी केली आणि महाराष्ट्राने 129 धावांनी विजय मिळवला. तर पंजाब विरुद्ध त्याने 73 धावांची खेळी आणि 3 बळी घेतले. सिक्किम विरुद्ध त्याने नाबाद 18 धावा करत 3 बळी घेतले होते.
रामकृष्ण घोषमध्ये सामना फिरवण्याची ताकद आहे. त्यामुळे आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्स त्याला 7 व्या क्रमांकावर खेळण्याची सतत संधी देऊ शकते.
Comments are closed.