रामराजे निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकरांचं मनोमिलन होणार? रामराजेंच्या वक्तव्यानं चर्चाना उधाण
रामराजे नाईक निम्बालकर: मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल असे मत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र अलीकडच्या काळात दोघांच्याही मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या मनोमिलनाच्या चर्चेवर प्रथमच रामराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वरिष्ठांनी सांगितलं तर होईल, नाहीतर हे मनोमिलन होणार नाही
मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल असे मत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. वरिष्ठांनी सांगितलं तर होईल. नाहीतर हे मनोमिलन होणार नाही. हा निर्णय लोकांच्या हातात आहे लोक ठरवतील, अशी प्रतिक्रिया देऊन रामराजे यांनी मनोमिलनाचा चेंडू रणजीत नाईक निंबाळकर यांच्याकडे ढकलला आहे. यामुळे रणजीत नाईक निंबाळकर यावर काय बोलतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर मोडेल, वाकेल ते फक्त शेतकऱ्यांसाठी
फलटण येथे निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मनोमिलनाच्या वक्तव्याच्या चर्चेला पूर्णविराम लावला. तालुक्याच्या विकासासाठी रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांचा देखील सल्ला घेण्यात येईल पण राजकारण म्हणजे व्यवसाय नाही. मला कुणाला भेटायचे तर दहा वेळा चर्चेची दारे उघडी करू, पण ज्यांनी शेतकऱ्याला लाटण्याचा प्रयत्न केला अशा माणसांसोबत रणजीतसिंह नाईक निंबाळकर स्वप्नात सुद्धा बसणार नाहीत. रणजितसिंह नाईक निंबाळकर मोडेल, वाकेल ते फक्त शेतकऱ्यांसाठी, जहागीरदारांसाठी नाही असे निंबाळकर म्हणाले. तालुक्याला कर्तबदार आमदार मिळाला आहे त्यांच्या माध्यमातून विकास चालू आहे. त्यामुळे अशा अफवांना बळी पडू नका असेही ते म्हणाले.
विकासासाठी सल्ला घेऊ, आपल्याला बदला नको
विकासासाठी सल्ला घेऊ, आपल्याला बदला नकोय बदलाव तालुक्यात करायचा आहे. त्यामुळं शेतकऱ्याला नडणाऱ्या लोकांसोबत दोस्ती करायची नाही, अनैसर्गिक युती किंवा अनैसर्गिक मनोमिलन या तालुक्यांमध्ये होणार नाही असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगत मनोमिलनाच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.