दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
रणजितसिंह निंबाळकरांवर रामराजे निंबाळकर: फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर रणजित नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांनी जाहीर सभा घेत आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे मास्टरमाईंडच्या सांगण्यावरुन करण्यात आले आहेत, मी नार्को टेस्टला तयार आहे, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तयार व्हावं नाहीतर निंबाळकर नाही असं जाहीर करावं, असं आव्हान त्यांनी रामराजे निंबाळकरांना (Ramraje Naik Nimbalkar) दिलं आहे. आता रामराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, उद्यापासून आचारसंहिता लागेल. काही गोष्टी बोलता येणार नाहीत. त्यामुळे आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. मागची 30 वर्ष आम्ही काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे, असे मी याआधीही बोललो आहे. त्यांनी आरोप केला की, हे रामराजे यांनी केलं. त्यांनी माझं टोपण नाव मास्टर माईंड ठेवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, ती रद्द व्हावी, असे सांगितले गेले. या संदर्भात माझा काहीही संबंध नाही.
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: मुलीच्या आत्महत्या प्रकरणी सखोल तपास करावा
ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या झाली त्याचा मास्टरमाईंड मीच आहे का? पोलिसांना जे सांगितले त्याचा ही मास्टरमाईंड मीच आहे का? त्यांनी माझ्यावर अब्रू नुकसान दावा लावावा. मुलीच्या आत्महत्या प्रकरणी सखोल तपास करावा. Dysp धस यांच्याकडे तक्रार केली, त्याचा तपास केला नाही. या त्या गोष्टी आहेत त्यात माझा काय संबंध? धस साहेब कोणामुळे आले? धस यांची चौकशी व्हावी. यासाठी एसआयटीची मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत आहे, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले.
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: फलटण तालुक्याची बदनामी झाली की नाही?
रामराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले की, विकास ही माझी संस्कृती आणि इथली लोकं ही माझी मुले आहेत. धस यांच्या काळात 277 केसेस झाल्यात. मग फलटण तालुक्याची बदनामी झाली की नाही? बाकी कारखान्याबाबत तक्रारी झाल्या नाहीत. मी या केसेस कोर्टात नेणार आणि त्या उच्च न्यायालयात नेऊन एसआयटीची मागणी करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: हे असले धंदे करतात आणि मास्टरमाईंड मीच
आगवणे हा कोणाचा कार्यकर्ता आहे हे सगळ्यांना माहिती आहे. क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये रामराजे यांचे नाव घ्यायला सांगितले. मुलीला आत्महत्या करायला लावले, असे सांगितले. यातही मास्टर माईंड मीच आहे, असे सांगितले. हे असले धंदे करतात आणि मास्टरमाईंड मीच आहे असे सांगतात. हे जे सगळं चाललं आहे. त्यात फलटणची अब्रू कुठं राहिली? राजकारण कुठं राहिले? 2023 पासून माजी खासदारांचे नाव मी घेतलं नाही. त्यांना आरोपी करा हे कोण म्हणाले त्याची चौकशी करा, अशी आमची मागणी असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?
जयकुमार गोरे प्रकरणात माझे फोन झाले म्हणून माझी पोलिसांनी चार तास चौकशी झाली होती. 2022 साली मला गुंतवण्याचा प्रयत्न केला मी कधी तक्रार केली का? 2019 ला अजित पवार यांच्यावर पाणी चोरल्याचा आरोप केला. त्यांचा आमदार कशावर उभा राहिला? ननावरे केस झाली त्याला मी सांगितले का त्याचा मास्टरमाईंड मीच आहे का? दुधाचा अभिषेक केला हा इव्हेंट नाहीतर काय आहे. अभिषेक कोणाला घालतात देवाला, हा काय देव आहे का? प्रशासकीय दबावाने शेवटच्या माणसाला हैराण केलं त्याच्या विरोधात मी लढणार आहे. आमची लोक ही आमची मुले आहेत. त्यांना मी बरबाद होऊ देणार नाही. सत्तेतून पैसे कसे मिळवायचे हे या सद्गृहस्थाला माहीत आहे. माजी खासदारांनी सुषमा अंधारेंची माफी मागितली आणि मला टार्गेट केलं. हा माणूस या ठिकाणी जन्माला आला तीच फलटणची पुण्याई. त्यांनी अभिषेक केला मी तर गोमूत्र ओतून घेणार आहे, असा टोला त्यांनी यावेळी रणजित निंबाळकरांना लगावला.
आणखी वाचा
आणखी वाचा
			
											
Comments are closed.