Akshaya Tritiya Rangoli: अक्षय्य तृतीयेला दारासमोर काढण्यासाठी सोपी रांगोळी
अक्षय्य तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. या वर्षी अक्षय्य तृतीयेची तिथी 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरू झाली असून 30 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार, 30 एप्रिल 2025 रोजी, बुधवारी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल. धार्मिक श्रद्धेनुसार, अक्षय्य तृतीयेला स्नान करणे, दान करणे, सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणे शुभ मानले जाते. कोणत्याही शुभ प्रसंगी दारासमोर रांगोळी काढणे शुभ मानले जाते. आज आम्ही तुम्हाला अक्षय्य तृतीयेला दारासमोर काढण्यासाठी रांगोळीच्या काही सोप्या डिझाइन्स सांगत आहोत
- अक्षय्य तृतीयेला दारासमोर तुम्ही ही सोपी रांगोळी काढू शकता. यासाठी तुम्हाला हिरव्या, लाल, पिवळ्या अशा रंगाची गरज लागेल. या डिझाइनमध्ये लक्ष्मीची पावले असल्याने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दारासमोर काढण्यासाठी ही परफेक्ट डिझाइन आहे.
2. तुम्हाला रंगाची रांगोळी काढता येत नसेल तर तुम्ही फुलांची ही सुंदर रांगोळी काढू शकता. यासाठी तुम्हाला झेंडूची पिवळी, केशरी फुले लागतील. याशिवाय आंब्याच्या पानांचा वापर करून तुम्ही रांगोळी पूर्ण करू शकता.

3. फुलांपासून तुम्ही खालील डिझाइन सुद्धा काढू शकता. यासाठी तुम्हाला झेंडूची फूले, गुलाबाच्या पाकळ्या आणि आंब्याची पाने लागतील.
4. फूले किंवा रांगोळीचा वापर न करता तुम्ही तांदळाचा वापर करून दारात सुंदर रांगोळी काढू शकता. यासाठी विविध रंगाचे तांदूळ घेऊन त्यापासून खालील रांगोळी काढता येईल.
5. तुम्ही फक्त रंगापासून रांगोळी काढू शकता. पांढऱ्या फरशीवर अशा रांगोळी खूप छान दिसतात.
हेही पाहा –
Comments are closed.