सलग दुसरे शतक! करुण नायरची रणजीत धडाकेबाज कामगिरी, टीम इंडियात कमबॅक कधी?
Ranji Trophy 2025 Quarter Finals: करुण नायरने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे. विदर्भासाठी त्याने क्वार्टर फायनल सामन्यात शतक झळकावले. शनिवारपासून विदर्भ विरुद्ध तमिळनाडू यांच्यात रणजी ट्रॉफी 2024-25 चा दुसरा क्वार्टर फायनल सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विदर्भाने पहिल्या डावात 264 धावा केल्या. यादरम्यान करुणने शतक झळकावून एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर अथर्व तायडे आणि आदित्य ठाकरे स्वस्तात बाद झाले. ध्रुव शोरे देखील काही खास करू शकला नाही. पण यानंतर करुण नायरने जबाबदारी सांभाळली. दानिश मालेवारने त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला. मात्र, तो 75 धावा करून बाद झाला. दुसरीकडे करुण नायरने शतक झळकावून पहिल्या दिवसाचा खेळ संपवून नाबाद परतला.
घरगुती क्रिकेटमधील शेवटच्या 11 सामन्यांमध्ये करुन नायर:
– शंभर.
– 44* अनचेड.
– शंभर.
– शंभर.
– शंभर.
– शंभर.
– पन्नास.
– 27 (31).
– तीस.
– शंभर.
– आता शंभर*.– ही करुण नायरची वेडे सुसंगतता आहे .. !!!! 🥶🫡 pic.twitter.com/q9ejoczhs6
– तनुज सिंग (@imtanujsing) 8 फेब्रुवारी, 2025
खरंतर करुणने या खेळी दरम्यान एक खास विक्रम केला. त्याने विदर्भासाठी सलग दुसरे शतक झळकावले आहे. करुणने यापूर्वी हैदराबादविरुद्ध दुसऱ्या डावात 105 धावा केल्या होत्या. आता त्याने क्वार्टर फायनलमध्ये तमिळनाडूविरुद्ध शतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत करुण नायर 180 चेंडूंचा सामना करत 100 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारले.
विदर्भाने 25 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या. यानंतर, संघाची तिसरी विकेट 44 धावांवर पडली. करुण सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ज्यामध्ये त्याने शतक झळकावले आणि पहिल्या दिवशी संघाची धावसंख्या 264 धावांवर नेली. सलामीवीर अथर्व शून्यावर बाद झाला. ध्रुव शोर 26 धावा करून बाद झाला. आदित्य 5 धावा करून बाद झाला. दानिशने 119 चेंडूंचा सामना करत 75 धावा केल्या. कर्णधार अक्षय वाडकर 24 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
हेही वाचा-
“विजयाची आस, भक्तीचा प्रकाश!” कटक वनडेपूर्वी भारतीय खेळाडू भगवान जगन्नाथच्या चरणी लीन
अश्विनचं रोहितला पाठबळ! म्हणाला, खऱ्या चॅम्पियनची ओळख….
Ranji Trophy; अंशुल कंबोजचा कहर! मुंबईच्या फलंदाजांची घसरगुंडी
Comments are closed.