जम्मू आणि काश्मीरने रचला इतिहास! कर्नाटकचा पराभव करत पहिल्यांदाच जिंकली रणजी ट्रॉफी

रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामात इतिहास रचला गेला आहे. कारकिर्दीत प्रथमच अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या जम्मू-काश्मीरने थेट विजेतेपद पटकावले आहे. यावेळी त्यांनी अंतिम सामन्यात आठ वेळेचा विजेता कर्नाटकला चांगलीच टक्कर दिली आहे.
कर्नाटकविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राहिल्यानंतर पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे जम्मू आणि काश्मीरने पहिले रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात जम्मू-काश्मीरने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही कमाल केली आहे. त्यांनी पहिल्या डावात ५८४ धावा केल्या होत्या.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.