ना कॅच, ना रनआऊट, ना स्टम्पिंग…, तरीही फलंदाज OUT! सगळेच चक्रावले; रणजी ट्रॉफीमध्ये नेमकं काय
रणजी करंडक २०२५-२६ मणिपूर लामाबम सिंग बाद : क्रिकेटच्या मैदानावर कोणतीही घटना कधीही घडू शकते, पण रणजी ट्रॉफीमध्ये एका सामन्यात जे घडलं ते पाहून खेळाडू आणि प्रेक्षक सगळेच अवाक झाले. ना कोणता कॅच झाला, ना स्टम्पिंग, ना रनआऊट तरीही फलंदाजाला ‘आऊट’ देण्यात आलं आणि क्षणभर संपूर्ण मैदान गोंधळून गेलं. अगदी गल्ली क्रिकेटची आठवण झाला. खरंतर, तब्बल 20 वर्षांनंतर एक फलंदाज दोनदा बॅटने चेंडू मारल्यामुळे आऊट झाला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू अनेकदा विचित्र पद्धतीने बाद होताना दिसतात. मणिपुर–मेघालय रणजी प्लेट लीग सामन्यात मणिपुरचा फलंदाज अजय लामबम सिंह हा दुर्मिळ प्रकार आऊट झाला. 20 वर्षांपूर्वी जम्मू-काश्मिरचा ध्रुव महाजन अशाच प्रकारे आऊट झाला होता.
दोनदा बॅट लावल्यामुळे दिला ‘आउट’
मणिपुरच्या डावातील एका ओव्हरमध्ये अजय लामबम सिंह मेघालयचा गोलंदाज आयरन बोरा याचा चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळतो. पहिल्यांदा बॅटला लागल्यानंतर चेंडू थेट स्टंपकडे जातो. त्यावेळी आपली विकेट वाचवण्यासाठी अजयने पुन्हा बॅटने चेंडू मारला. ज्यामुळे मेघालयच्या खेळाडूंनी अपील केले आणि अंपायर धर्मेश भरद्वाज यांनी अजय लामबम सिंहला आऊट ठरवले. अजयला त्यामुळे त्याला नाराज होऊन मैदान सोडावे लागले आणि हा प्रसंग सोशल मीडियासह क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला.
नियमांवर काय म्हणाले?
वेन्यू ऑफिशियलने क्रिकइन्फोला सांगितले की, अजय बॅटऐवजी पॅडचा वापर करून चेंडूला दूर करू शकला असता, परंतु त्याने पुन्हा बॅटचाच वापर केला, जो नियमांनुसार ‘हिट द बॉल ट्वाइस’ या आऊट प्रकारात मोडतो.
पण एमसीसीच्या नियमांनुसार, जर फलंदाज फक्त आपला विकेट वाचवण्यासाठी बॅट किंवा हाताचा उपयोग करत असेल, तर त्याला आऊट देता येत नाही. या निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटर आर. अश्विन यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत हा निर्णय अंपायरिंगमधील चूक असल्याचे सूचित केले.
आज मी गली क्रिकेटमध्ये आतापर्यंतच्या दुर्मिळ गुन्ह्यासाठी आऊट झालो – दोनदा चेंडू मारणे.
पहिला शॉट: बचाव केला.
दुसरा शॉट: माझे स्टंप वाचवण्यासाठी घाबरून स्वाइप करा.
तिसरी गोष्ट: संपूर्ण लेन ओरडत आहे “OUTTT!” विश्वचषक फायनलपेक्षा जोरात. 😂🏏लामाबम सिंगला मारल्याबद्दल आऊट देण्यात आले… pic.twitter.com/YIQUD5AnjA
— अश्विन 🇮🇳 (@ashwinravi99) 19 नोव्हेंबर 2025
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.