गिलनंतर जडेजाही फेल! सात वेळा रणजीत रिजेक्ट झालेल्या गोलंदाजाचा कहर, घेतल्या 6 विकेट्स

रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामात भारताचे अनेक खेळाडू खेळत आहेत. त्यामध्ये भारताचा वनडे-कसोटी कर्णधार शुबमन गिल आणि स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा यांच्या खेळीवर चाहत्यांचे विशेष लक्ष होते. दोघेही सध्या खराब फॉर्ममध्ये असून ते स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत लयीत येतील अशी अपेक्षा होती, मात्र दोघांनीही चांगलीच निराशा केली आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये गिल पंजाब आणि जडेजा सौराष्ट्राकडून खेळत आहे. हे दोन्ही संघ गुरूवारी (२२ जानेवारी) राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर एकमेंकाविरोधात खेळत आहे. यामध्ये आतापर्यंत २३ विकेट पडल्या असून गिल दोन चेंडू खेळत शून्यावर बाद झाला, तर जडेजाही ६ चेंडूत ७ धावा करत परतला. तसे जडेजाने दोन विकेट घेतल्या. दोघेही न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत अपयशी झाल्यानंतर या स्पर्धेतही नीट खेळले नाही.

या सामन्यात सौराष्ट्राने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. जडेजाचे बाकी सरकारी देखील लवकर बाद झाले. त्यामुळे सौराष्ट्राचा पहिला डाव ४७.१ षटकात सर्वबाद १७१ धावसंख्येवर आटोपला. या डावामध्ये पंजाबकडून फिरकीपटू हरप्रीत ब्रारने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. पंजाबचा पहिला डावही १३९ धावसंख्येवर आटोपला. यामध्ये सौराष्ट्राकडून पर्थ भूतने ५ विकेट घेतल्या. सौराष्ट्राच्या दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरू असून त्यांच्या दिवसाखेर २४ धावांवर ३ विकेट्स पडल्या आहेत.

या सामन्यात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी ३० वर्षीय हरप्रीतची राहिली. त्याचा हा प्रथम श्रेणीतील तिसराच सामना असून त्याने ४ डावांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने कारकिर्दीत पहिल्यांदाच पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. त्याचे टी२० क्रिकेटमध्येही गोलंदाज म्हणून उत्तम प्रदर्शन राहिले आहे. त्याने १०२ डावांमध्ये १०२ विकेट्स घेतल्या असून तो संघाचा मुख्य गोलंदाज आहे. विशेष म्हणजे त्याला पंजाबच्या रणजी ट्रॉफी संघात सातवेळा प्रवेश नाकारला गेला होता.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेनंतर जडेजा या प्रकारातून निवृत्ती घेणार की काय, या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याने याआधी भारताच्या टी२० मधून निवृत्ती घेतली आहे, तर गिलही खराब फॉर्ममुळे भारताच्या टी२० संघाचा भाग नाही.

Comments are closed.